Wednesday, January 7, 2015

समलैगिंक, तृतीयपंथीयांना सन्मानाने वागवावे

समलैगिंक किंवा तृतीयपंथी असणे हे नैसर्गिक आहे. पण गैरसमजामुळे त्यांची समाजाकडून उपेक्षा होते. निकोप समाजासाठी त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे, असे मत 'आजचा सवाल'मध्ये व्यक्त झाले. समलैंगिक / तृतीयपंथी व्यक्तींच्या मानवी हक्कांची आपल्या देशात पायमल्ली होतेय का? असा आजच्या चर्चेचा विषय होता.


यात मानसोपचारतज्ज्ञ आशिष देशपांडे, ट्रान्सजेंडर कार्यकर्ती लक्ष्मी त्रिपाठी, समपथिक संघटनेचे अध्यक्ष बिंदुमाधव खिरे सहभागी झाले.


चर्चेत सुरुवातीला लक्ष्मी त्रिपाठी यांनी मुंबई जिमखाना पार्टीत झालेल्या अपमानाचा अनुभव सांगितला. ब्रिगेडिअर बोस यांनी मला पार्टीतून बाहेर काढायला सांगितल्यानंतर आम्ही निषेध करत पार्टी सोडली. पण हा प्रकार म्हणजे माझ्या आत्मसन्मानावर बलात्कार आहे, असे मी समजते. ब्रिटीशांच्या काळात यात जिमखान्यावर 'इंडियन ऍन्ड डॉग्ज आर नॉट अलाऊड' असा बोर्ड लावलेला होता. पण आता स्वातंत्र्यानंतरही सरकारला केवळ 1 रुपया भाडे देणार्‍या या जिमखान्यावर आमचा अशा प्रकारचा अपमान होणे ही लाजीरवाणी बाब आहे, असे लक्ष्मी म्हणाल्या.


तर खिरे म्हणाले, अगदी वयात आल्यापासून आमच्या खच्चीकरणास सुरुवात होते. इतरांना कळले तर आपले सर्व पातळ्यांवर खच्चीकरण होईल, याचे टेन्शन आल्यानेच अनेकजण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात.


देशपांडे म्हणाले, समलैंगिकता किंवा ट्रान्सजेंडर हे नैसर्गिक आहे. हे शास्त्रानेही ते सिद्ध केलेले आहे. पण आपल्याकडे या लोकांची उपेक्षा होते. त्यांच्यासाठी 'हिजडा' म्हणजे समाजात स्थान नसलेले असा शब्द सर्रास वापरला जातो. पण या लोकांमध्ये वेगवेगळ्या शारिरीक स्थिती असतात. इंग्रजीत त्या सगळ्यांना नावे ठरलेली आहेत. पण आपल्याकडे अजूनही त्याबाबत काहीही माहिती नाही. होमो, गे किंवा ट्रोन्सजेंडर हे नैसर्गिक आहे. ती आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यामुळे या माणूसपणाचा अनादर करणार्‍या मुंबई जिमखान्याच्या आणि समाजाच्या वतीने मी लक्ष्मी यांची माफी मागतो.


तर यासाठी समाजाच्या आणि विशेषत: राजकारण्यांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे, असे लक्ष्मी यांनी मत मांडले.
खरे म्हणाले,  केवळ कायद्यातच नव्हे तर मानवी दृष्टीकोनातही बदल होणे गरजेचे आहे. 


आता ही मानवी हक्काची लढाई आम्ही थांबवणार नाही, असा निश्चय करताना लक्ष्मी म्हणाल्या, मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी मुंबई जिमखान्याचे सीईओ, कलेक्टर आणि पोलीस कमिशनरला नोटीस पाठविली आहे. तृतीयपंथीयांची हेळसांड आणि शोषणाविरुद्ध आम्ही लढा सुरूच ठेवणार आहोत.


खरे म्हणाले, मानवी हक्कांसाठी आम्हाला दरवेळी कोर्टात धाव घ्यावी लागणे हेच दुदैर्वी आहे. त्यामुळे याबाबतचे अगदी प्राथमिक शिक्षण देण्याचे काम करावे लागणार आहे.


देशपांडे म्हणाले, हे चित्र बदलण्यासाठी सगळ्यांनी मदत करणे आवश्यक आहे. त्यासाठी कुटुंब, मित्रपरिवारापासून सुरुवात करावी लागेल.


चर्चेचा शेवट करताना 'आयबीएन-लोकमत'चे संपादक निखिल वागळे म्हणाले, माणसांच्या हक्कांची पायमल्ली करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कारण आपण मानवी हक्कांची सनद स्वीकारलेली आहे.


चर्चेच्या सुरुवातीला समलैंगिक / तृतीयपंथी व्यक्तींच्या मानवी हक्कांची आपल्या देशात पायमल्ली होतेय का? या प्रश्नाचे उत्तर 50 टक्के लोकांनी 'होय' असे दिले. पण चर्चा ऐकल्यानंतर 81 टक्के लोकांनी या लोकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचे मत नोंदवले.

source IBN LOKMAT http://im.ibnlokmat.tv/showvideo.php?id=99522

इतर देशांमधील काही विचित्र सेक्स कायदे


कदाचित वाचून खरं वाटणार नाही. ………………

लेबनॉन मधे प्राण्यांच्या बरोबर सेक्स्युअल इंटरकोर्स करणं हा गुन्हा नाही.. जर तो प्राणी फिमेल असेल तर. पण जर तो प्राणी मेल असेल तर मात्र प्राण दंडाची शिक्षा आहे.

बहरिन मधे पुरुष डॉक्टर कायद्याने स्त्रीचे अंतर्गत अवयव तपासू शकतो, पण त्यांच्या कडे डायरेक्ट पहाणं कायद्याने सम्मत नाही. त्या अवयवांकडे तपासणीसाठी पहाण्या करता त्याला ’ त्या अवयवांच्या’ आरशातल्या प्रतिमांकडे पाहून तपासावे लागते .

गुआम मधे बरेचसे पुरुष केवळ पैसे घेउन व्हर्जिन मुली डिफ्लॉवर करण्याचे काम करतात. आता हे असं का?? याचं कारण आहे की, गुआम मधे व्हर्जिन्स ना लग्नाचा अधिकार नाही.

ट्रॉपिकल फिश स्टोअर्स मधे लिव्हरपुल , इंग्लंड ला टॉपलेस सेल्स गर्ल्स लिगली अलाउड आहेत.

कॅली ( Cali) कोलंबीया ला स्त्री जेंव्हा पहिल्यांदा तिच्या पती बरोबर समागम करेल तेंव्हा तिची आई समोर असणे आवश्यक आहे.

अमेरिकेत ओरल सेक्स इल्लिगल आहे ( अरीझोना इनक्लुडेड)
व्हर्जीनिया मधे लाइट्स सुरु ठेउन समागम करणे कायद्याने गुन्हा आहे.

ऑरिगोन, ला पतीने समागमाच्या वेळेस सेक्सी बोलणं कायद्याने गुन्हा आहे.

वॉशिंग्टन डीसी मधे मिशिनरी पोझिशन मधे समागम करणे लिगली मान्य आहे. इतर सगळ्या पोझिशन्स इल्लिगल!

हॅरिस्बर्ग, पेनिसिल्व्हिया ला ट्रक ड्रायव्हर बरोबर टोल बुथ मधे समागम करणे गुन्हा आहे.

उटाह मधे फर्स्ट कझिन बरोबर लग्न करायचे असल्यास कायदेशिर वय आहे ६५!

जर प्राण्याचे वजन चाळिस पाउंडापेक्षा कमी असेल तर वॉशिंगटन डिसी मधे त्या प्राण्याबरोबरचा समागम अगदी कायदेशिर आहे.

दोहा , कतार मधे जर एखाद्या स्त्री ला आंघोळ करतांना एखाद्या परपुरुषाने पाहिले तर तिने आधी आपला चेहेरा झाकला पाहिजे असा कायदा आहे.

डेट्रॉइट ला कार मधे समागम करणे कायदेशीर नाही. फक्त कार स्वतःच्या मालकीच्या परिसरात असेल तर मात्र असा समागम कायदेशीर आहे.

असे हज्जारो कायदे आहेत, तुम्ही ईंटरेस्टेड असाल तर नेट वर सर्च करा. काही तर खूपच फनी आहेत.

मनात उत्सुकता आणि तोंडाला कुलूप !


समलिंगी संबंध या विषयावरील मूलभूत प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे ! स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या अवस्था कोणत्या? स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या चार अवस्था निसर्गाला अभिप्रेत आहेत. १) ऑटो सेक्शुअल, २) होमो सेक्शुअल, ३) हेट्रो सेक्शुअल, ४) नो सेक्शुअल कोणताही मानव प्राणी (स्त्री-पुरुष) या चार अवस्थांतूनच जावा, अशी निसर्गाची अपेक्षा असते; पण सगळीच माणसं एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जात नाही. काही पहिल्याच अवस्थेत अडकून पडतात, तर काही दुसर्‍या, तर काही थेट चौथ्या अवस्थेतच जन्माला येतात. १) ऑटो सेक्शुअल (वय वर्ष 0 ते ७) जन्माला आल्यापासून सात वर्षांपर्यंत मनुष्यप्राणी साधारण याच अवस्थेत जगतो. स्वतच्या वाढीसाठी, आनंदासाठी या वयात ते मूल फक्त घेत असतं, त्याला प्रेमबिम काही कळत नाही. ‘घेणे’ हाच त्याचा या काळातला धर्म ! २) होमो सेक्शुअल (वय वर्ष ७ ते १४) आपण जी समलिंगी संबंधांची चर्चा करतोय ती या अवस्थेत खरं तर जन्माला येते. ही अत्यंत नैसर्गिक अवस्था आहे. या वयात येणार्‍या प्रत्येकाला समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटतं. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं / मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच ! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही. ३) हेट्रो सेक्शुअल (वय वर्ष १४ ते ४२) पहिल्या दोन अवस्थांतून पुढे सरकलेली व्यक्ती १४ ते ४२ या वयोगटात हेट्रो सेक्शुअल असते. निसर्गानेच केलेली ही रचना, मानवी वंशाच्या वृद्धीसाठी. निर्मिती आणि शरीरसुखासाठी ! या वयात सर्वसाधारणपणे विभिन्न लिंगी व्यक्तीविषयी शारीरिक आकर्षण वाटतं. व्यक्ती वयाने वाढते. शरीरसंबंध आणि जनन-वृद्धी होते. ४) नो सेक्शुअल (या अवस्थेला काही वय नाही.) काही माणसांना जन्मतच ‘सेक्स’ या गोष्टीविषयी काही रस नसतो. त्यांच्यात या प्रकारच्या भावना जन्मालाच येत नाहीत. त्यांना कोणाविषयी कधीच आकर्षण वाटत नाही. निसर्गाला वयाच्या ४२ वर्षांनंतर ही अवस्था अपेक्षित आहे. जी व्यक्ती पहिल्या तीन अवस्था पुरेपूर जगली ती आपोआप या अवस्थेत येते. ------***------ समलिंगी संबंध म्हणजे काय? समलिंग असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री - स्त्री अथवा पुरुष - पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय? - पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते. समलिंगी असणं अनैसर्गिक आहे का? समलिंगी असणं अत्यंत नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेत तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. समलैंगिक असणं ही विकृती किंवा हा काही आजार आहे का? - नाही. समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला - स्त्रीचं, पुरुषाला - पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, आपल्या समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समाजाची आणि कुटुंबीयांची भीती आणि अवहेलना होईल ही भावना. नैसर्गिक लैंगिक अग्रक्रम यांव्यतिरिक्त समलिंगी संबंध ठेवण्यामागे इतर काही कारणे असू शकतात का? पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यामानानं कमी धोकादायक वाटतं. समलिंगी संबंधांपासून दूर रहायचं कसं? मला अनेक पत्रं या विषयावर येतात. त्यात अनेकदा अशा संबंधांमध्ये नकळत्या वयात आलो आणि पुढे त्याची सवय झाली, असं सांगणारीही पत्रं असतात. याचा अर्थ ती व्यक्ती समलिंगी असतेच असं नाही. विविध कारणांमुळे ती अशा संबंधांमध्ये ओढली गेलेली असते. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. १) नैसर्गिकरीत्या समलिंगी व्यक्तीचं आकर्षण तुम्हाला वाटत नसेल, तर असे संबंध ठेवूइच्छिणार्‍यांपासून चार हात लांब राहिलेलं बर. २) आपल्याला क्षणिक थरार वाटतोय; पण त्याचबरोबर विभिन्न लिंगी आकर्षणही जागं आहे, असं वाटत असेल, तर या भोवर्‍यातून स्वतला अक्षरश ओढून बाहेर काढा. ३) कोणाही मित्र-मैत्रिणीला तुमच्या (शारीरिक अर्थाने) अधिक जवळ येऊ देऊ नका. ४) विशिष्ट अवयवांचा शरीर स्पर्श टाळा. ‘त्या’ अवयवांना झालेल्या स्पर्शातून जी उत्तेजना निर्माण होते ती टाळणं महाकठीण असतं. उत्तेजना-उद्रेक-उत्तेजना हे चक्र भल्याभल्यांना भेदता येत नाही. त्यामुळे कितीही मोह झाला, दबाव आला तरी शरीरसंबंधाचे प्रयोग करणं टाळा. ५) आकर्षण फारच वाटत असेल, परिस्थिती आवाक्याबाहेर जात असेल तर पालकांशी, शिक्षकांशी, मोठय़ा मित्र-मैत्रिणीशी किंवा ज्या कोणावर तुमचा भरोसा असेल त्याच्याशी बोला. मदत घ्या. ६) मुख्य म्हणजे तुमची समस्या मांडायला लाजू नका. यात काहीही चूक नाही. किंवा ते पापही नाही. समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला या गुंत्यातून बाहेर यायचं असेल, तर काय केलं पाहिजे? १) समलिंगी नसणारी व्यक्ती जर अशा संबंधांमध्ये अडकली असेल, तर अर्थातच तिला यातून बाहेर येता येतं. पण त्यासाठी नेटानं आणि खूप जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. २) योग्य समुपदेशन (कौन्सिलिंग), डॉक्टरांची मदत, औषधं आणि मनावर संयम याच्या मदतीने समलिंगी आकर्षणाच्या अवस्थेतून समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला बाहेर पडता येतं. ३) वय कमी असेल तर गुंता कमी. मात्र, २१ ते २८ या वयोगटात या अवस्थेतून बाहेर पडणं महाजिकिरीचं होऊ शकतं. ४) प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं आणि समलिंगी नसणारी व्यक्ती या गुंत्यातून बाहेर पडू शकते. समलिंगी संबंधांतून एड्सचा धोका आहे का? समलिंगी नसणार्‍या व्यक्तीने समलिंगी संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीस एड्सचा धोका उद्भवत नाही, असा समज अनेकांचा असतो. मात्र, हा गैरसमज आहे. कशाही प्रकारच्या संबंधात असणार्‍या जोडीदारापैकी कुणालाही एच.आय.व्ही. चा संसर्ग झालेला असल्यास निरोध न वापरता आलेल्या संबंधातून एड्सचा धोका होऊ शकतो. असुरक्षित संबंधातून कोणालाही एड्स होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. समलिंगी नसलेल्या पण समलिंगी संबंधात असणार्‍या व्यक्तीला ‘तसले’ संबंध सोडून लग्न करून आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं असेल, तर ते शक्य आहे का? निकोप वैवाहिक आयुष्य लाभेल? मुलंबाळं होतील? का या संबंधाचा शरीरावर काही दुष्परिणाम होतात? प्रयत्न केले, समुपदेशन घेतलं तर समलिंगी संबंधांतून समलिंगी नसणारी व्यक्ती बाहेर येऊ शकते. लग्नही करू शकते. मुलंबाळंही होऊ शकतात. पण हे सारं करत असताना आपलं समलिंगी आकर्षण पुन्हा जागं होणार नाही, याची काळजी त्या व्यक्तीनं घेणं जरुरीचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर आणि मूूलबाळ झाल्यानंतर सदर व्यक्ती परत समलिंगी संबंधांमध्ये गेली, तर त्याचे त्याच्या सांसारिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील. लग्न केल्यानंतरच्या शरीरसंबंधांवर परिणाम होत नाही; पण मनात समलिंगी आकर्षण तसंच असेल तर मात्र मनाचा आणि शरीराचा कोंडमारा आणि विचित्र झगडा सुरू होऊ शकतो.
Photo: मनात उत्सुकता आणि तोंडाला कुलूप !

समलिंगी संबंध या विषयावरील मूलभूत प्रश्नांची शास्त्रशुद्ध उत्तरे ! स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या अवस्था कोणत्या? स्त्री-पुरुष शारीरसंबंधांसंदर्भात मानवी जगण्याच्या चार अवस्था निसर्गाला अभिप्रेत आहेत. १) ऑटो सेक्शुअल, २) होमो सेक्शुअल, ३) हेट्रो सेक्शुअल, ४) नो सेक्शुअल कोणताही मानव प्राणी (स्त्री-पुरुष) या चार अवस्थांतूनच जावा, अशी निसर्गाची अपेक्षा असते; पण सगळीच माणसं एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जात नाही. काही पहिल्याच अवस्थेत अडकून पडतात, तर काही दुसर्‍या, तर काही थेट चौथ्या अवस्थेतच जन्माला येतात. १) ऑटो सेक्शुअल (वय वर्ष 0 ते ७) जन्माला आल्यापासून सात वर्षांपर्यंत मनुष्यप्राणी साधारण याच अवस्थेत जगतो. स्वतच्या वाढीसाठी, आनंदासाठी या वयात ते मूल फक्त घेत असतं, त्याला प्रेमबिम काही कळत नाही. ‘घेणे’ हाच त्याचा या काळातला धर्म ! २) होमो सेक्शुअल (वय वर्ष ७ ते १४) आपण जी समलिंगी संबंधांची चर्चा करतोय ती या अवस्थेत खरं तर जन्माला येते. ही अत्यंत नैसर्गिक अवस्था आहे. या वयात येणार्‍या प्रत्येकाला समलिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटतं. ते शरीरसुखाच्या संदर्भात असतं असं नाही; पण आपल्यासारख्याच दिसणार्‍या, आपल्याच वयाच्या (किंवा त्याहून मोठय़ाही) व्यक्तीचं आकर्षण या वयात अत्यंत स्वाभाविक. याच वयात मुलं-मुलं / मुली-मुली अशी घट्टमुट्ट मैत्री व्हायला लागते. हे सगळं त्या वयात शारीरिक, मानसिक वाढीसाठी पूरक-पोषकच असतं. त्यात ‘सेक्स’ अभिप्रेत नसतो, त्याची जाणीवही पुसटशी असते; पण आकर्षण वाटतं ते मात्र फक्त समलिंगी व्यक्तींचंच ! मात्र काही जण याच अवस्थेत अडकून पडतात. जन्मभर या अवस्थेत तरी राहतात, नाहीतर काही काळाने बायसेक्शुअल अवस्थेत जातात. समलिंगी शरीरसंबंध निर्माण होतात. कारण ही अवस्था संपत नाही. ३) हेट्रो सेक्शुअल (वय वर्ष १४ ते ४२) पहिल्या दोन अवस्थांतून पुढे सरकलेली व्यक्ती १४ ते ४२ या वयोगटात हेट्रो सेक्शुअल असते. निसर्गानेच केलेली ही रचना, मानवी वंशाच्या वृद्धीसाठी. निर्मिती आणि शरीरसुखासाठी ! या वयात सर्वसाधारणपणे विभिन्न लिंगी व्यक्तीविषयी शारीरिक आकर्षण वाटतं. व्यक्ती वयाने वाढते. शरीरसंबंध आणि जनन-वृद्धी होते. ४) नो सेक्शुअल (या अवस्थेला काही वय नाही.) काही माणसांना जन्मतच ‘सेक्स’ या गोष्टीविषयी काही रस नसतो. त्यांच्यात या प्रकारच्या भावना जन्मालाच येत नाहीत. त्यांना कोणाविषयी कधीच आकर्षण वाटत नाही. निसर्गाला वयाच्या ४२ वर्षांनंतर ही अवस्था अपेक्षित आहे. जी व्यक्ती पहिल्या तीन अवस्था पुरेपूर जगली ती आपोआप या अवस्थेत येते. ------***------ समलिंगी संबंध म्हणजे काय? समलिंग असणार्‍या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधांना समलिंगी संबंध असे म्हणतात. समान लिंगी व्यक्तींचे म्हणजे स्त्री - स्त्री अथवा पुरुष - पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. गे आणि लेस्बियन असणे म्हणजे काय? - पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना ‘गे’ म्हटले जाते. पुरुषाला फक्त पुरुषाचंच आकर्षण असणं व पुरुषाला फक्त पुरुषाशीच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा होणं अशा पुरुषांना ‘गे’ म्हटलं जातं. तर स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना ‘लेस्बियन’ म्हटलं जातं. अशा स्त्रियांना फक्त स्त्रियांचंच आकर्षण वाटतं. स्त्रियांबरोबरच लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते. समलिंगी असणं अनैसर्गिक आहे का? समलिंगी असणं अत्यंत नैसर्गिक आहे. प्रत्येक व्यक्तीचे लैंगिक अग्रक्रम असतात. सर्वसामान्यपणे स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं. म्हणजेत तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी पुरुषाला पुरुषाबद्दल आणि स्त्रीला स्त्रीबद्दल आकर्षण वाटतं, सहवास आणि पुढे जाऊन सहजीवन व्यतित करावंसं वाटतं याचा अर्थ तो त्यांचा लैंगिक अग्रक्रम असतो. समलैंगिक असणं ही विकृती किंवा हा काही आजार आहे का? - नाही. समलैंगिकतेकडे कल असणं ही विकृती नाही. हे नैसर्गिक आहे. आणि हा कुठलाही आजार नाही. ही एक शरीराची व मनाची अवस्था आहे. जसं पुरुषाला स्त्रीचं आकर्षण वाटणं, स्त्रीला पुरुषाचं आकर्षण वाटणं, त्यांना एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवावेसे वाटणं हे नैसर्गिक आहे, त्याचप्रमाणे स्त्रीला - स्त्रीचं, पुरुषाला - पुरुषाचं आकर्षण वाटू शकतं. समान लिंगाच्या व्यक्तींबरोबर संबंध ठेवण्याकडे कल असू शकतो. मात्र, आपल्या समाजाने अशा संबंधांना मान्यता दिलेली नसल्यामुळे त्याकडे विकृती म्हणून बघितलं जातं. समलिंगी संबंध ठेवणारे अनेक स्त्री-पुरुष समाजात आहेत. पण अशा नात्याला कायद्यानेही मान्यता नसल्याने पुढे येऊन आपले लैंगिक अग्रक्रम मान्य करणं त्यांना अवघड जातं. यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे समाजाची आणि कुटुंबीयांची भीती आणि अवहेलना होईल ही भावना. नैसर्गिक लैंगिक अग्रक्रम यांव्यतिरिक्त समलिंगी संबंध ठेवण्यामागे इतर काही कारणे असू शकतात का? पौगंडावस्थेत आणि तारुण्यात जी मुलं समलिंगी संबंधात अडकतात त्याला जबाबदार अनेकदा आजूबाजूचं वातावरण असतं. काही मुलांची शरीरधारणा हेट्रोसेक्शुअलच असते; पण केवळ मानसिक-भावनिक आधार शोधण्यासाठी ही मुलं समलिंगी संबंधांचा आधार घेतात. किंवा अनेकदा महाविद्यालयीन दिवसात लैंगिक आयुष्यात निरनिराळे प्रयोग करून बघण्याची इच्छा बळावते आणि अशावेळी समलिंगी व्यक्तीबरोबर लैंगिक प्रयोग करून बघणं त्यामानानं कमी धोकादायक वाटतं. समलिंगी संबंधांपासून दूर रहायचं कसं? मला अनेक पत्रं या विषयावर येतात. त्यात अनेकदा अशा संबंधांमध्ये नकळत्या वयात आलो आणि पुढे त्याची सवय झाली, असं सांगणारीही पत्रं असतात. याचा अर्थ ती व्यक्ती समलिंगी असतेच असं नाही. विविध कारणांमुळे ती अशा संबंधांमध्ये ओढली गेलेली असते. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. १) नैसर्गिकरीत्या समलिंगी व्यक्तीचं आकर्षण तुम्हाला वाटत नसेल, तर असे संबंध ठेवूइच्छिणार्‍यांपासून चार हात लांब राहिलेलं बर. २) आपल्याला क्षणिक थरार वाटतोय; पण त्याचबरोबर विभिन्न लिंगी आकर्षणही जागं आहे, असं वाटत असेल, तर या भोवर्‍यातून स्वतला अक्षरश ओढून बाहेर काढा. ३) कोणाही मित्र-मैत्रिणीला तुमच्या (शारीरिक अर्थाने) अधिक जवळ येऊ देऊ नका. ४) विशिष्ट अवयवांचा शरीर स्पर्श टाळा. ‘त्या’ अवयवांना झालेल्या स्पर्शातून जी उत्तेजना निर्माण होते ती टाळणं महाकठीण असतं. उत्तेजना-उद्रेक-उत्तेजना हे चक्र भल्याभल्यांना भेदता येत नाही. त्यामुळे कितीही मोह झाला, दबाव आला तरी शरीरसंबंधाचे प्रयोग करणं टाळा. ५) आकर्षण फारच वाटत असेल, परिस्थिती आवाक्याबाहेर जात असेल तर पालकांशी, शिक्षकांशी, मोठय़ा मित्र-मैत्रिणीशी किंवा ज्या कोणावर तुमचा भरोसा असेल त्याच्याशी बोला. मदत घ्या. ६) मुख्य म्हणजे तुमची समस्या मांडायला लाजू नका. यात काहीही चूक नाही. किंवा ते पापही नाही. समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला या गुंत्यातून बाहेर यायचं असेल, तर काय केलं पाहिजे? १) समलिंगी नसणारी व्यक्ती जर अशा संबंधांमध्ये अडकली असेल, तर अर्थातच तिला यातून बाहेर येता येतं. पण त्यासाठी नेटानं आणि खूप जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. २) योग्य समुपदेशन (कौन्सिलिंग), डॉक्टरांची मदत, औषधं आणि मनावर संयम याच्या मदतीने समलिंगी आकर्षणाच्या अवस्थेतून समलिंगी नसणार्‍या व्यक्तीला बाहेर पडता येतं. ३) वय कमी असेल तर गुंता कमी. मात्र, २१ ते २८ या वयोगटात या अवस्थेतून बाहेर पडणं महाजिकिरीचं होऊ शकतं. ४) प्रबळ इच्छाशक्ती असेल, तर तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं आणि समलिंगी नसणारी व्यक्ती या गुंत्यातून बाहेर पडू शकते. समलिंगी संबंधांतून एड्सचा धोका आहे का? समलिंगी नसणार्‍या व्यक्तीने समलिंगी संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीस एड्सचा धोका उद्भवत नाही, असा समज अनेकांचा असतो. मात्र, हा गैरसमज आहे. कशाही प्रकारच्या संबंधात असणार्‍या जोडीदारापैकी कुणालाही एच.आय.व्ही. चा संसर्ग झालेला असल्यास निरोध न वापरता आलेल्या संबंधातून एड्सचा धोका होऊ शकतो. असुरक्षित संबंधातून कोणालाही एड्स होऊ शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. समलिंगी नसलेल्या पण समलिंगी संबंधात असणार्‍या व्यक्तीला ‘तसले’ संबंध सोडून लग्न करून आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं असेल, तर ते शक्य आहे का? निकोप वैवाहिक आयुष्य लाभेल? मुलंबाळं होतील? का या संबंधाचा शरीरावर काही दुष्परिणाम होतात? प्रयत्न केले, समुपदेशन घेतलं तर समलिंगी संबंधांतून समलिंगी नसणारी व्यक्ती बाहेर येऊ शकते. लग्नही करू शकते. मुलंबाळंही होऊ शकतात. पण हे सारं करत असताना आपलं समलिंगी आकर्षण पुन्हा जागं होणार नाही, याची काळजी त्या व्यक्तीनं घेणं जरुरीचं आहे. कारण लग्न झाल्यानंतर आणि मूूलबाळ झाल्यानंतर सदर व्यक्ती परत समलिंगी संबंधांमध्ये गेली, तर त्याचे त्याच्या सांसारिक आयुष्यावर विपरीत परिणाम होतील. लग्न केल्यानंतरच्या शरीरसंबंधांवर परिणाम होत नाही; पण मनात समलिंगी आकर्षण तसंच असेल तर मात्र मनाचा आणि शरीराचा कोंडमारा आणि विचित्र झगडा सुरू होऊ शकतो. समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे? भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना तर मान्यता नाहीच; पण मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींना जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समान अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य या कलमांचे उल्लंघन होते, असा आग्रह धरून या कायद्यात कालोचित बदल करण्याच्या मागणीसाठी काही सामाजिक संस्थांनी मिळून हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. समलैंगिक संबंध असणार्‍या आणि ज्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावेत, असे काही मुद्दे - - समलैंगिकतेसंदर्भात शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समलिंगी व्यक्तीला त्याच्या स्वप्रतिमेबद्दल हजारो प्रश्न निर्माण होतात. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही, अशी भावना बळावते आणि समलिंगी व्यक्ती अनेकदा समाज आणि कुटुंबीयांच्या दबावाखाली लग्न करायला तयार होते. परिणामत लग्नानंतर जोडीदाराशी शारीरसंबंधांमध्ये अडचण तर येतेच; पण त्याचबरोबर संसार निभावून नेणेही कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत अडकलेले काही जण घटस्फोट घेतात, तर काही घटस्फोटाचे कारण समाजाला कळले तर, या भीतीपोटी नाती आणि संसार रेटत राहतात. यात फरफट फक्त समलिंगी व्यक्तीची होते असं नाही, तर त्याच्या जोडीदाराचीही होते. - मानसिक, भावनिक व कौटुंबिक तसेच सामाजिक हे सर्व पैलू एकमेकांशी निगडित आहेत. ज्यावेळी आपल्याला आपल्या स्वतच्या लैंगिकतेची ओळख होते, त्यानंतर स्वतला नाकारण्यात काहीच अर्थ असत नाही. - व्यक्तीला स्वतला स्वीकारणं जसं अवघड जातं, तसंच समलिंगी कल असणार्‍या व्यक्तीचा स्वीकार करणं तिच्या कुटुंबालासुद्धा अवघड जातं. कित्येकदा अशा व्यक्तीचा कुटुंबामध्ये स्वीकार केला जात नाही. कुटुंबातील नातेसंबंध यामुळे बिघडतात, समाजामध्ये मानहानीला बळी पडावे लागते. समलिंगी आहे म्हणून ब्लॅकमेल केले जाते, लुबाडले जाते व जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते, अन्याय, अत्याचारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटुंबीयांनी अशा व्यक्तीस नाकारू नये. अपमानाने वागवू नये.
-oksygen (lokmat)


 समलैंगिकतेसंदर्भात कायदा काय आहे? 


भारतीय दंडसहिता कलम ३७७ नुसार समलिंगी संबंधांना तर मान्यता नाहीच; पण मुखमैथुन, गुदमैथुन त्याचप्रमाणे हस्तमैथुन करणे याला कायद्याची मान्यता नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. अशा प्रकारे संबंध करणार्‍या व्यक्तींना जन्मठेप अथवा काही वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. या कायद्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या समान अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य या कलमांचे उल्लंघन होते, असा आग्रह धरून या कायद्यात कालोचित बदल करण्याच्या मागणीसाठी काही सामाजिक संस्थांनी मिळून हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे. समलैंगिक संबंध असणार्‍या आणि ज्यांचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी समलिंगी आहेत अशा व्यक्तींनी लक्षात घ्यावेत, असे काही मुद्दे - - समलैंगिकतेसंदर्भात शारीरिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक पैलूंचा विचार करणे महत्त्वाचे आहे. समलिंगी व्यक्तीला त्याच्या स्वप्रतिमेबद्दल हजारो प्रश्न निर्माण होतात. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाणार नाही, अशी भावना बळावते आणि समलिंगी व्यक्ती अनेकदा समाज आणि कुटुंबीयांच्या दबावाखाली लग्न करायला तयार होते. परिणामत लग्नानंतर जोडीदाराशी शारीरसंबंधांमध्ये अडचण तर येतेच; पण त्याचबरोबर संसार निभावून नेणेही कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत अडकलेले काही जण घटस्फोट घेतात, तर काही घटस्फोटाचे कारण समाजाला कळले तर, या भीतीपोटी नाती आणि संसार रेटत राहतात. यात फरफट फक्त समलिंगी व्यक्तीची होते असं नाही, तर त्याच्या जोडीदाराचीही होते. - मानसिक, भावनिक व कौटुंबिक तसेच सामाजिक हे सर्व पैलू एकमेकांशी निगडित आहेत. ज्यावेळी आपल्याला आपल्या स्वतच्या लैंगिकतेची ओळख होते, त्यानंतर स्वतला नाकारण्यात काहीच अर्थ असत नाही. - व्यक्तीला स्वतला स्वीकारणं जसं अवघड जातं, तसंच समलिंगी कल असणार्‍या व्यक्तीचा स्वीकार करणं तिच्या कुटुंबालासुद्धा अवघड जातं. कित्येकदा अशा व्यक्तीचा कुटुंबामध्ये स्वीकार केला जात नाही. कुटुंबातील नातेसंबंध यामुळे बिघडतात, समाजामध्ये मानहानीला बळी पडावे लागते. समलिंगी आहे म्हणून ब्लॅकमेल केले जाते, लुबाडले जाते व जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते, अन्याय, अत्याचारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कुटुंबीयांनी अशा व्यक्तीस नाकारू नये. अपमानाने वागवू नये.
-oxygen (lokmat)

स्वानंदला साडी नेसायची आहे

समलैंगिकतेच्या पलीकडचा एक आयाम आहे तो आहे ट्रान्सजेंडर व्यक्तींचा. मानसिक अवस्था स्त्रीची आणि शरीर पुरुषाचं किंवा याच्याउलट स्थिती असलेल्या व्यक्तींची होणारी कुचंबणा फार गंभीर स्वरूपाची असते आणि त्यातून मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडू शकतं. अशाच एकाची - ’स्वानंद’ची ही कथा. ही कथा कुणाचीही असू शकेल, पण त्यातलं दुःख तेच असेल. ट्रान्सजेंडर व्यक्तींना समजून घेऊन त्यांचा जगण्याचा मार्ग सुकर कसा होईल याविषयीचं विवेचन करणारी ही कथा
भरारी ही संस्था पुण्यामध्ये एचआयव्हीसंक्रमित काम करते, विशेषतः पुरुषांकरता. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काम करणार्‍या किंवा त्यांच्याकडे येणार्‍या बर्‍याच पुरुषांना आपण स्त्री आहोत असं सातत्याने वाटत असतं. पुरुषांच्या शरीरात स्त्रीचं मन अडकलं आहे, अशी यांची भावना असते. त्यामुळे ते त्यांच्या मनाचं समाधान स्त्रीवेश करून, दागदागिने, मेक-अप, इतर सौंदर्य प्रसाधने वापरून व एवढेच नव्हे तर बोलण्यात, चालण्यात स्त्रियांसारखे हावभाव करून स्त्रियांप्रमाणे समाजात उघडपणे वावरत असतात. बरेचदा काहीजण फक्त एकांतात, आपल्या मित्र परिवारात समाजास कळणार नाही याची काळजी घेऊन आपल्या स्त्रीमनाचं समाधान करून घेत असतात. त्यांचे नावही ते स्त्रीरूपी लावतात. त्यांच्या या स्त्री भावनेची कल्पना घरच्यांना कधी असते तर कधी नसते. जे समाजात उघडपणे स्त्री म्हणून जगतात त्यांना तृतीयपंथी किंवा हिजडा म्हणून ओळखले जाते व जे समाजात उघडपणे स्त्री म्हणून वावरत नाहीत, परंतु एकांतात आपल्या इच्छा पूर्ण करतात त्यांना कोती म्हणून संबोधले जाते.
आज संस्थेचे बरेच कार्यकर्ते फिल्डमध्ये गेले होते व काऊन्सेलरखेरीज दोनच कार्यकर्त्या चतुरा आणि रूबिना (जन्मतः पुरूष) संस्थेत आल्या होत्या. त्यांच्याशी संस्थेच्या झालेल्या व राहिलेल्या कामकाजाविषयी चर्चा चालू होती. तेवढ्यात एक मध्यमवयीन महिला तेथे आली. कष्टातून आयुष्य उभे केल्यावर आलेला एक कणखरपणा या महिलेत दिसत होता. मध्यम बांध्याची, काळी-सावळी, गळ्यात मंगळसूत्र, कानात कळकटलेले टॉप्स, दोन्ही हातात काचेच्या बांगड्या, एका हातात घड्याळ व अंगावर नॉयलॉनची साडी परिधान केलेली ही महिला चिंतातूर पण खंबीर वाटत होती. महिलेकडे बघून एकंदर तिची आर्थिक परिस्थिती बेताचीच असावी असं वाटत होतं.
दारातूनच महिलेने आपली ओळख करून दिली, ‘‘मी स्वानंदची आई.’’ व तिने संस्थेतील काही मुलांची चौकशी केली. ‘‘सुनीलने मला भेटायला बोलावलं होतं. कुठे आहे तो?’’ बाई विचारत होती.
‘‘सुनील मुंबईला गेला आहे. दोन दिवसाने येईल. तो आल्यावर तुम्हाला कळवतो.’’ चतुराने त्यांना सांगितलं.
तसं, ‘‘असं करू नका रे पोरांनो. माझ्यापासून काही लपवू नका. तुमच्याकडे खूप आशा ठेवून आले आहे. मला सगळं कळलंय. मुंबईला त्याला पाहिलं होतं तेव्हा का नाही कळवलं मला?’’ आई गहिवरून विचारत होती.
स्वानंदबद्दल थोडीशी कल्पना असल्यामुळे काऊन्सेलरने त्याच्या आईला जवळ बोलावलं व पाणी प्यायला देऊन त्यांची चौकशी केली.
काऊन्सेलर- आधी तुम्ही शांत व्हा बघू आणि काय झालं ते सांगा.
आई - स्वानंद घर सोडून निघून गेलाय. क्लासला जातो म्हणाला आणि परत आलाच नाही.
काऊन्सेलर- घरी काही भांडण झाली होती का?
आई - नाही हो, कुणाला वेळ आहे. त्याचे वडील लकव्याने अंथरूणावर पडलेले होते. पाण्यासारखा पैसा खर्च केलाय त्यांना बरं करण्याकरता, तेव्हा आता कुठे ते कामावर जायला लागले आहेत. ते तर आधीच खंगलेत. माझा सगळा वेळ त्यांचं करण्यातच जातो. त्यात दुकानही मलाच बघावं लागतं. कुणाला वेळ आहे भांडण करायला.
काऊन्सेलर- तरी पण काही तरी झालं असणार. ही पोरं सांगत होती, की त्याला घरात मारहाण केली जायची. आठ दिवस जेवायलाही दिलं नव्हतं.
आई- मी पण ऐकलंय. त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं आहे, की आम्ही त्याच्याशी वाईट वागतो. त्याला वडील मारतात. पण आम्ही का करणार असं? काय कमी आहे पैशाची आमच्याकडे. त्यानं आम्हाला सांगायचं होतं ना. ‘ते तर नैसर्गिक आहे.’ आम्ही दोघं इथपर्यंत बरोबर आलो होतो. तो क्लासला जातो म्हणून गेला. मी दुकानात गेले. मला काय माहीत हा असं करेन. तरी माझ्या मुलीने मला कल्पना दिली होती, की तो क्लासच्या वेळा पाळत नाही. तेव्हाच मी लक्ष घालायला हवं होतं. मी त्याच्याबरोबर क्लासपर्यंत जायला हवं होतं. दोन महिने झालेत अजून त्याचा एक फोनही आलेला नाही. त्याचे वडील पण रोज विचारत असतात. काय उत्तर देणार मी त्यांना.
काऊन्सेलर- तो तर जॉब करत होता ना?
आई- ‘‘कसला जॉब, एक महिना केला असेल. त्याने फिटरचा कोर्स केला आहे, पण आम्ही त्याच्याकडून कुठलीच अपेक्षा करत नाही. तुम्ही विचारत होता ना, त्याला मारलं होतं का? हो, मागच्या वर्षी त्याच्या वडिलांनी त्याला दोन-तीन थापडा दिल्या होत्या. पण का? तो कधीच वेळेत घरी यायचा नाही. त्याचा भाऊ जेलमध्ये (त्याला गुंतवलं आहे), वडिलांची तब्येत ही अशी, सध्याचे दिवस कसे आहेत. कुणी बदला घेण्याकरता काही केलं तर? कुणाचं काही सांगता येतं का? बर्‍याच वेळा त्याची बहीण एकटीच असते घरात. त्याने घरी वेळेत यावं एवढीच आमची अपेक्षा. आमचं काही चुकलं का यात?’’ तुम्हीच सांगा.
काऊन्सेलर- तुमची मनःस्थिती मी समजू शकते.
आई- नाही म्हणायला मीच कधीतरी त्याला बोलायचे, ‘‘काय हे शेळपटासारखं वागणं तुझं, तू पुरूष आहेस, जरा खंबीर वागत जा. उद्या तुझ्यावर घराची, कुटुंबाची, मुलांची जबाबदारी असेन. घरात दोन गाड्या पडल्यात. तुला साध्या त्या चालवतादेखील येत नाहीत. तुझा उपयोग काय? कधी आणिबाणीच्या परिस्थितीत तू आमच्याकरता काही करू पण शकणार नाहीस. असं मी त्याला टोकायचे. पण मला काय माहीत, त्यावेळेस मला माहीतही नव्हतं की हा असा आहे. त्याने मला सांगायला पाहिजे होतं. मला माहीत आहे, हे तर नैसर्गिक आहे.’’
‘‘ही सगळी संपत्ती कुणाकरता? दोघा भावांकरता दोन घरं बांधली आहेत. दुकानाचे गाळे आहेत. नुसता दुकानाचा गाळा बघितला असता तरी चाललं असतं आम्हाला. चार महिन्यांपूर्वीच बँकेचं खातं उघडायला लावलं होतं त्याला. त्याच्या खात्यात पैसे जमा करत होते. तुम्हीच सांगा काय कमी केलं होतं त्याला?’’
‘‘काय गरज होती त्याला साडी नेसून पैशाकरता भीक मागायची? मला सगळं कळलंय. ऐकवत नाही ते. हृदय फाटून येतं. त्यापेक्षा आपण मेलेलं बरं. असला मुलगा नसलेला बरा. माणूस मेल्यावर तरी धाय मोकलून रडता येतं; पण जिवंत गायब असलेल्या माणसाकरता तेही करता येत नाही! मी शांत झोपूही शकत नाही.’’
काऊन्सेलर- मी तुमच्या भावना समजू शकते- तुम्ही तुमचं मन शांत करा. मग मी तुम्हाला सर्व गोष्टी नीट समजावून सांगते, मग आपण काय पर्याय सापडतो का ते पाहू यात. त्याआधी तुम्ही ‘ते नैसर्गिक असतं’ असं म्हणालात म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला, ते मला सांगाल का?
आई- मी ऐकून आहे की पुरूष-पुरूष संबंध नैसर्गिक असतात.
काऊन्सेलर- हो, अगदी बरोबर, याला समलिंगी संबंध म्हणतात. जे पुरूषा-पुरूषामध्ये व स्त्री-स्त्रीमध्येही असतात. पण तुम्हाला ते मनापासून पटतंय ना? कारण त्याचा तुमचा तुमच्या मुलाशी असणार्‍या नात्यावर परिणाम होणार आहे.
आई- आता पोरगं घराबाहेर साडी नेसून फिरण्यापेक्षा ते बरं.
काऊन्सेलर- म्हणजे तुम्ही तडजोड म्हणून या गोष्टीचा स्वीकार करत आहात. तुमचंही यात खूप काही चुकतंय असं नाही. सामाजिक चौकटी बाहेरच आयुष्य जगणार्‍यांचा स्वीकार करायला माणसाला खूप मोठं धैर्य लागतं. नाईलाजानं का होईना तुम्ही एवढं तरी स्वीकारलं ते ही काही कमी नाही.
आता तुमच्या मुलाला स्वतःबद्दल जे काही वाटतं त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते, म्हणजे तुमचं नेमकं कुठं चुकतंय तुम्हाला लक्षात येईल.
तुमचा मुलगा फक्त समलैंगिक आहे असं नाही. तर त्याला स्वतःला आपण स्त्री आहोत, असं वाटत आहे. त्याच्यातील स्त्री पुरूषाच्या शरीरात अडकली आहे, अशी त्याच्या मनाची धारणा आहे. म्हणजे तो मानसिकरित्या स्त्री आहे. त्याला आपण स्त्रीसारखे जगावे वाटते. या स्थितीला मानसिक लिंगभावात (सायकॉलॉजिकल जेंडर) बदल असणे असे समजले जाते. यालाच इंग्रजीत ट्रान्स जेंडर असे म्हटले जाते. आणि जेव्हा ही ट्रान्स जेंडरची भावना निर्माण होते तेव्हा साहजिकच स्त्रीसारखं दिसावं असं वाटणं ओघानं आलंच. त्याकरता स्त्रियांप्रमाणे वेशभूषा-केशभूषा करणे, स्त्रियांची कामे करण्यात जास्त रूची असणे व आपण समाजात स्त्रीसारखं जगावं म्हणून साडी नेसणे इत्यादी लक्षणं दिसतात. पोषाखावरून व्यक्ती स्त्री आहे की पुरूष हे लगेच निदर्शनास येते. या त्यांच्या स्थितीला सामाजिक लिंगभाव स्त्री आहे (सोशल जेंडर) म्हणून समजले जाते. यालाच इंग्रजीत ट्रान्सवेस्टाईट असे म्हटले जाते. आणि याच कारणामुळेच तो पुरूषांची कामेही करायला तयार नाही. उदा. मोटारसायकल चालवणे, क्रिकेट खेळणे वगैरे.
आई- तुम्ही ते कामाचं म्हटला त्यावरून आठवलं. माझा स्वानंद एकदम शांत व नम्र मुलगा आहे, त्याचं कामही इतकं व्यवस्थित असतं आणि त्याला स्वच्छता फार लागते. मला जमलं नाही तर तोच घर साफ करायचा. मी थकली असेल तर तो स्वयंपाक करायचा, मला चहा करून द्यायचा. मी घरी आले की माझी पापी घ्यायचा आणि विचारायचा, ‘‘आई तू कशी आहेस?’’ असा मुलगा मला फोन न करता कसा राहू शकेल हेच मला कळत नाही.
काऊन्सेलर- याचं उत्तर तुम्ही मघाशीच दिलं आहे. तुम्ही त्याला पुरुषार्थावरून उणं-दुणं बोलायचा, त्याला दूषणं द्यायचा, प्रसंगी मारहाणपण करायचा. त्यामुळे अशी मुलं घरापासून दूर जाऊ लागतात. घरात त्यांना कोणी समजून घेणार नाही असं वाटू लागतं. आजूबाजूचे लोक, मित्रमंडळीही त्यांना चिडवत असतात. उपहासाने त्याच्याशी वागतात. तेव्हा त्यांची खूप घुसमट होत असते. एकीकडे त्यांचे मन स्त्रीसारखे राहण्याकरता बंडाळी करत असतं, तर दुसरीकडे त्यांना समजून घेईल असं कोणी त्यांना दिसत नसतं. या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षणातलं लक्ष उडू लागतं. ते घराबाहेर जास्त वेळ काढू लागतात. आपल्यासारखं कोणी आहे का? याचा शोध घेतात व त्याच्यासारख्या मुलांबरोबर रहायला लागतात. अशा मैत्रीतूनच त्यांना समलिंगीसंबंध ठेवणारे पुरूषही भेटू लागतात.
इथे हे पण लक्षात घ्या, की स्त्रियांनी-पुरूषांनी कसे वागायचे, कुठली कामे करायची, स्त्रीत्व-पुरूषत्व म्हणजे काय या सर्व गोष्टी समाजाने ठरवलेल्या आहेत. ज्याला आपण लिंगभाव (जेंडर) म्हणतो. मूल जन्माला घालणे ही गोष्ट सोडली तर स्त्रीत्वात-पुरूषत्वात विशेष असा काहीही फरक नाही. समाजाने ठरवलेले लिंगभावाचे मापदंड प्रत्येक व्यक्तीत कमी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे स्त्रीत्वाचे म्हणून ओळखले जाणारे गुण पुरूषातही असतात व पुरूषत्वाचे म्हणून ओळखले जाणारे गुण स्त्रीमध्येही असतात. एखाद्या व्यक्तीला असे का वाटत असावे याचे खास असे कारण नाही, एवढे नक्की की मानवी प्राण्यांत स्त्री व पुरूष देहांमध्ये स्त्रीत्व व पुरूषत्वाच्या निर्देशकांचे (जेंडर नॉर्मचे) प्रमाण कमी प्रमाणात असलेली व्यक्तिमत्वे असतात. कारण आयडियल स्त्री व आयडियल पुरूष किंवा पुरूषत्व व स्त्रीत्वाची व्याख्या करताना वापरण्यात येणारे मोजदंड (जेंडर नॉर्म) हे समाजाने ठरवलेले आहेत, याची अनेक उदाहरणे ही आपल्याला ऐतिहासिक काळापासून देता येतील. उदा. झाशीची राणी, मदर इंडियात पुरूषच जास्त आहेत. (संजीव कपूरच्या पाककृती तर टीव्हीमुळे अगदी प्रसिद्ध झाल्या आहेत.) आता तर अनेक मुली मोटार सायकल चालवत आहेत. ट्रक, रेल्वे चालवणार्‍या महिलाही आहेत. मानसिक पातळीवरही उदाहरणच द्यायचे झाले तर रडणे ही स्त्री-पुरूषांच्या बाबतीतील आयुष्यातील भावनात्मक आंदोलने प्रकट करणारी एक प्रतिक्रिया. पण घरातील लहान मुलगा जेव्हा रडतो तेव्हा आपण त्याला काय बाईसारखा रडतो असं बोलून पुरूषांनी रडायचे नसते असा त्याच्यावर संस्कार करतो. प्रत्यक्षात मात्र दाटून आलेल्या भावनांना रडून वाट मोकळी करून देण्याची गरज स्त्री व पुरूष दोघांचीही असते. लहान मुलांच्या बाबतीत बघितलं तर मुलं जवळ जवळ सहा-सात वर्षांची होईपर्यंत मुलगा किंवा मुलगी तेवढ्याच मोठ्याने भोकाड पसरतात. बरेचदा आपण लहान मुलींनाही सांगतो. तू ब्रेव्ह मुलगी आहेस ना मग असं पडल्यावर रडायचं नाही, असे आपणच पुरूषत्वाच्या व स्त्रीत्वाच्या गुणधर्मांचे त्यांच्यावर संस्कार केलेले असतात. अनेक स्त्रियांना चटकन रडू येत नाही, तर अनेक पुरूषांच्या डोळ्यांत चटकन पाणी तरळू शकते म्हणून त्यांना आपण दोष देऊ शकत नाही, समाजाने ठरवलेल्या अशा या अनेक मोजदंडांच्यावर आधारित स्त्री व पुरूष स्वतःचे पुरूषत्व व स्त्रीत्व सिद्ध करण्याचा खटाटोप करत असतात. या स्त्री-पुरूष प्रकृतीमध्ये ज्या प्रकृतीच्या व्यक्ती संख्येने जास्त प्रमाणात दिसतात त्यांनाच सर्वमान्यता मिळते व ज्यांचे प्रमाण कमी आहे त्यांना लवकर स्वीकारले जात नाही. कारण त्यांना स्वीकारताना अनेक सामाजिक संकल्पनांना आव्हान केले जाते. त्यामुळे इथे हेही लक्षात घ्यायला हवे, की पुरूषांनी घरकाम, स्वयंपाक करणे यात कुठलाही कमीपणा नाही. फक्त एखाद्या व्यक्तीस हे करत असताना त्यांचा मानसिक लिंगभाव स्वतः पुरूष आहे की स्त्री आहे यावर त्याच्या आयुष्यातील इतर सर्व घडामोडी अवलंबून असतात.
बरं मघाशी तुम्ही म्हणाला होता, की ‘‘ते तर नैसर्गिक आहे. त्याने मला सांगायचं होतं.’’ आता तुम्हीच मला सांगा की उद्या त्याने आपला जोडीदार पुरूष म्हणून निवडला व त्याच्याशी लग्न करायचे ठरवले तर तुम्हाला ते मान्य असेल.
आई- काही तरीच काय, समाजात आमची काय इज्जत राहील? असं कुठं झालंय का?
काऊन्सेलर- आणि नेमकं हेच तुमच्या मुलाने ओळखले आहे की तुमची त्यांच्या लैंगिकतेबद्दलची स्वीकृती वरवरची आहे व तो घरातून पळून गेला आहे. तुम्ही त्याला सांगा असं का नाही होऊ शकत. जेव्हा आपण समलैंगिकता नैसर्गिक आहे म्हणतो मग अशा व्यक्तिंमधले लग्न का नाही मान्य करू शकत आपण? शेवटी लग्न म्हणजे काय? दोन व्यक्तींनी लैंगिक सुखाकरता जोडीदार म्हणून आणि एकमेकांबरोबर सहजीवन जगण्यासाठी सामाजिकरित्या घेतलेली परवानगी. मग ती स्त्री-स्त्री किंवा पुरूष पुरूष जोडीदाराला का नसावी? ज्या देशांमध्ये समलैंगिकतेला कायद्याने परवानगी आहे उदा. कॅनडा, स्विडन इत्यादी त्या देशात असे विवाह केलेले जोडीदारही आहेत व अनेकांनी मुलं दत्तक घेऊन त्यांना नातवंडही झाली आहेत. आणि आपल्या भारतातही अशी परवानगी नसतानाही अशा काही व्यक्ती आहेत ज्या स्त्री-स्त्री किंवा पुरूष पुरूष जोडीदार म्हणून २५ वर्षांपेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे तरी जोडीदार म्हणून एकत्र राहात आहेत. मला कळतंय तुम्हाला हे सर्व जास्त होत आहे, पण मला तुम्हाला सर्व माहिती स्पष्ट सांगणे गरजेचे आहे. तुमच्यासारखे फारच कमी पालक आमच्याकडे येतात.
आता अशा मुलांच्या बाबतीतील आणखी एक गोष्ट म्हणजे स्वतःला स्त्री म्हणून समजणारे काही पुरूष पुढे जाऊन स्वतःचे पुरूष लिंग काढून घेतात व स्तनही वाढवतात. याला लैंगिकदृष्ट्या केलेले लिंग परिवर्तन म्हणतात, ज्याला इंग्रजीत ट्रान्ससेक्शुअल म्हटले जाते. हे ऐकून स्वानंदची आई ढसाढसा रडू लागली व म्हणाली,
आई- ‘‘हे काय भयानक ऐकतेय मी. त्या पेक्षा त्याचं लग्न लावून दिलं तर सुधारेल तरी तो.’’
काऊन्सेलर- अशा पुरूषांच्या आयुष्यात जे काही घडतं ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. आणि अशा मुलांचं लग्न लावून पालक आणखी एक मोठी चूक करतात. अशी अनेक मुलं स्त्री बरोबर संबंध ठेवू इच्छित नाहीत. तिच्या बरोबर ते लैंगिक आनंद मिळवू शकत नाहीत. फार झालं तर एक मूल होऊ देण्याकरता ते नाखुशीने बायकोबरोबर संबंध ठेवतात. काही वेळेस ते स्त्रीबरोबर लैंगिक संबंधही ठेवू शकत नाहीत. आणि यात दोघांचीही घुसमटच होत असते व सामाजिक चालीरीती सांभाळण्यात दोघांचाही बळी पडतो. जास्त करून अशा बायकोच्या आयुष्याचे खूप मोठे नुकसान होत असते. असा नवरा बाहेर जाऊन त्याचे लैंगिक सुख मिळवतच असतो, पण बायकोला मात्र खूप काही गमवावं लागतं. काहीजण आपापल्या परीने काही तडजोडीही करतात.
आई- पण आमच्या घरात तर असं कुणीच नाही. यावर काही औषध इलाज तर असेलचना?
काऊन्सेलर- आई आधी एक गोष्ट नीट लक्षात घ्या, हा काही आजार नाही. यात अनुवंशिकतेचाही काही प्रश्‍न नाही. अशी मुलं सर्व जाती धर्मात, सर्व देशात, सर्व आर्थिक परिस्थितीत आहेत. मला तुम्हीच सांगा आपल्यासारख्या ज्या देशात मुलगा व्हावा म्हणून गरोदरपणाची बाळाची लिंग तपासणी करून मुलीचा गर्भ असेल तर मोठ्या संख्येने गर्भपात होत आहे. जेथे स्त्रीला येवढे दुय्यम स्थान दिले जाते. अशा आपल्या पितृसत्ताक समाजात माणूस म्हणून जगताना पुरूषाला मिळणारे सर्व फायदे नाकारून एखाद्या मुलीला स्त्री म्हणून जगताना समाजात मिळणारी घृणास्पद वागणूक, अवहेलना सोसण्यास हौस मजा वाटत असेल का? कोण आपलं आयुष्य हौस म्हणून एवढं पणाला लावेल? या उलट समाज स्वीकारत नाही. आई-वडील समजून घेत नाहीत त्यामुळे होणारी त्यांची घुसमट यामुळे ही मुलं चिंता, स्वतःबद्दलची अस्विकृती, मानसिक ताणतणाव यातून नैराश्याकडे जातात व बरेचदा यांच्या मनात आत्महत्येचाही विचार घोळू लागतो किंवा करतात. ही या अवस्थेतून जाणार्‍या एका २२ वर्षाच्या मुलीने शेवटी मृत्युला जवळ केलेले माहीत आहे मला. तिने दागिने घालावेत, स्त्रियांचे कपडे घालावेत म्हणून आई-वडील तिला मारहाण करत असत. अनेकदा त्यांनी तिला चटकेही दिले होते. मैत्रिणी तिला जवळ करत नव्हत्या. तिला ससूनमध्ये मानसिक उपचारही सुरू केले होते, पण काही महिन्यातच तिने गळफास लावून घेतला. तुम्हाला वाटत असेल, की असा प्रकार मुलांमध्येच होत असेल, पण तसे नाही. काही मुलींनाही आपण स्त्री नसून पुरूष आहोत असे वाटत असते.
आई- मग आता मी काय करू. तुम्हीच काही तरी सुचवा मला. मला माझा मुलगा परत हवा आहे. कसाही असला तरी.
काऊन्सेलर- तो घरी राहून त्याची स्त्रीत्वाची भावना इथं काम करणार्‍या कोत्यांप्रमाणे जगला तर चालेल ना ते तुम्हाला? तशी तुम्ही खात्री देत असाल तर मी स्वानंदशी एकदा बोलून बघेन. पण घरी राहून कोत्यांप्रमाणे जगायचं की हिजड्यांच्या गटात राहायचं हा निर्णय सर्वस्वी त्याचा असेल. आणि एक गोष्ट अशा मुलांच्या आया त्यांना जास्त लवकर स्वीकारतात पण वडील आणि भाऊ जवळजवळ स्वीकारतच नाहीत. स्वानंद जर घरी आला तर याबाबतही तुम्हाला योग्य काळजी घ्यावी लागेल. आणि तुमचा स्वानंदला आधार आहे हे त्याला तुमच्या वागण्या-बोलण्यातून जाणवले पाहिजे, तरच तो घरात टिकेल.
आई- हो, त्याला समजून घ्यायचा मी नक्की प्रयत्न करेन, पण आधी त्याला घरी यायला सांगा. असे सांगून स्वानंदची आई निघून गेली.
बरेच निरोप पाठवल्यावर एक दिवस स्वानंद ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याने साडी नेसली होती.
कौन्सलरने त्याच्याशी सरळ विषयालाच हात घातला. तुझी आई आली होती. तुझ्याशिवाय तिला जेवण जात नाही. तुझी खूप काळजी वाटते. एक फोन तर करायचा होता तिला तू.
स्वानंद- काही सांगू नका मला. नुसतं घालून पाडून बोलतात मला घरात. माझी लहान बहीणही मारते मला. सारखी काही ना काही कारणावरून भांडण करतात माझ्याशी. बहिणतर माझ्या पाळतीवरच असते जणू. मग गेलो मी पळून आणि केलं एका हिजड्याला गुरू. आता मला माझ्या मनासारखं तरी राहता येतं.
काऊन्सेलर- पण तुला भीक मागावी लागते हेही खरंय ना. आणि शरीर विक्रयाचा धंदाही करावा लागत असेल तुला.
स्वानंद- मग आता साडी नेसल्यावर मला कोण काम देणार?
काऊन्सेलर- अगदी बरोबर बोलत आहेस तू. पण आता मी काय सांगते ते तू नीट ऐक. मग तू ठरव तुला कसं आयुष्य जगायचं ते. मी तुझ्या आईबरोबर तुझ्यातल्या स्त्रीत्वाबद्दल सर्व काही बोलले आहे. काही गोष्टी पटायला जरा अवघड असल्या तरी त्यांनी तुला आहे तसा स्वीकारायचं ठरवलं आहे.
स्वानंद - काय! तुम्ही आईला सर्व सांगितलं.
काऊन्सेलर- होय, कारण त्यांच्या शंका दूर करणं महत्त्वाचं होतं. आणि अनेकदा माणसाच्या हातून अनेक गोष्टी माहीत नसल्यामुळे, गैरसमजामुळे त्यांच्या हातून चुका होत असतात. त्यात त्यांची काही चूक आहे असं मला नाही वाटत. त्यांच्यापर्यंत योग्य माहितीच पोहचत नाही. आता तुलाही अशाच काही गोष्टी मला सांगायच्यात त्या नीट ऐक.
तू घरात राहून इतर कोत्यांसारखं आपली स्त्रीत्वाची हौस भागवू शकतो. तू या मुलांच्या संपर्कात असल्यामुळे ते कसं जगतात हे तुला माहीतच आहे. तू घरात राहिलास तुझ्या घरी दुकानाचा गाळा आहेच. तो तू चालवू शकतोस. तू चांगला पैसा कमवू लागलास. आर्थिकदृष्ट्या चांगला स्थिर झालास, घरच्यांचा भक्कम आधार झालास तर घरातील तुला आपोआप स्वीकारायला लागतील. तुझं काम करून उरलेला वेळ तू तुझ्या मित्रांबरोबर घालवू शकशील. एकदा घरच्यांनी तुला पूर्णपणे स्वीकारलं तर काही दिवसांनी तर तू साडी नेसूनही दुकानावर बसू लागशील. तुला भीक मागत फिरावं लागणार नाही. त्यातून पैसे ते किती कमावणार तू. त्यातही तुला कमाईतले अर्धे पैसे गुरूला द्यावे लागतीलच. आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे जगावे लागेल ते वेगळंच. सर्व नाती तुटतील तुझी. तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे असं ती सांगत होती.
स्वानंद- पण ते माझं मुलीशी लग्न लावून देतील त्याचं काय?
काऊन्सेलर- त्याहीबद्दल मी तुझ्या आईबरोबर बोलले आहे. तुला सुधरवायला म्हणून ते तुझं मुलीशी लग्न लावणार नाहीत याची मी तुला खात्री देते, पण तुझं मुलाशी लग्न लावायचं म्हटलं तर ते मात्र पेलणार त्यांना नाही हा, आणि नाहीतरी तुम्ही पोरं स्वतःच्या गटात किंवा मंदिरात जाऊन लग्न लावताचकी, लग्नावरून आणखी एक गोष्ट सांगायची आहे, की तू हिजड्यांमध्ये राहा नाहीतर कोत्यांबरोबर, जेव्हापण दुसर्‍या पुरूषाशी तुझा संबंध येईल तेव्हा कंडोम वापरायला तू विसरू नकोस. नाहीतर एचआयव्ही आणि गुप्तरोगाची लागण होण्याचा धोका तुला आहेच समज. तुमच्यासारख्या पुरूषांवर हिंसाचार होणं, जबरदस्तीने लैंगिक संबंध होणं, यांसारख्या गोष्टीही घडतात, हेही तू ऐकून असशीलच. त्याकरता असे प्रसंग कसे टाळायचे हे ही तुला शिकले पाहिजे.
स्वानंद- पण मला माझं पुरूष लिंग काढून टाकायचं आहे.
काऊन्सेलर- बरं झालं बोललास ते. तुला तेही करता येईल. हिजड्यांमध्ये राहून त्यांच्यामध्ये काही पुरूष लिंग तर तू कापून टाकशील. स्तन वाढवण्याकरता गोळ्याही घेशील किंवा सिलिकॉनचे स्तन बसवून घेशील हे मला मान्य आहे, पण तू जर चांगला पैसा कमावलास तर तुला अशा प्रकारचे उत्कृष्ट ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरांकडून हे लिंग बदलाचे ऑपरेशन करून घेता येईल. याला सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी म्हणतात. त्यात ते तुला प्रथम स्त्री संप्रेरके देऊन तुझं शरीर स्त्रीसारखे दिसेल असे बदल घडवून आणतील. त्यात तुझे स्तनही वाढतील. त्यानंतर तुझ्या लिंगाचे ऑपरेशन करतील. त्यावेळेस स्त्रियांना असतो तसा योनीमार्गही तयार करतील. यामुळे तुझ्याबरोबर शरीरसुख घेणारी व्यक्ती गुदमार्गाने सुख घेण्याऐवजी पुढून म्हणजे योनी मार्गातून लैंगिकसुख घेऊ शकेल आणि तुलाही देऊ शकेल. पण या ऑपरेशनकरता खर्च खूप असल्यामुळे सर्वसाधारण हिजडा समाजातील मुलं असे ऑपरेशन करून घेऊ शकत नाहीत. सिलिकॉनचे स्तन बसल्यामुळे अनेकदा त्याना स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता खूप वाटते. हिजड्यांच्या आयुष्यात थोडे वय झाल्यावर कमाई थंडावते. घरातच राहून चेल्यांच्या कमाईवर जगावे लागते. त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे ते घरात कुठलंही काम करत नाहीत. नुसती घरात बसून राहतात. कुठं फिरायला जाऊ शकत नाही. व्यायाम करू शकत नाही. शरीराच्या हालचाली कमी झाल्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढायला लागते. असे अनेक हिजडे तू पाहिलेच असशील. त्यामुळे मग डायबेटीस, ब्लडप्रेशर, हार्ट अट्यॅकचं प्रमाणही खूप जास्त आहे या लोकांच्यात.
हिजड्याचं आयुष्य जगतानाही त्याच्याकडे चांगला पैसा नसेल तर म्हातारपणी खूप हाल होतात त्यांचे. पैसे कमावण्याकरता किती दिवस भीक मागू शकशील आणि शरीरविक्रय करू शकशील तू? जोपर्यंत तरूण आहेस तोपर्यंतच आणि त्यातून किती पैसे साठवशील? त्यापेक्षा घरात राहून अगदी हिजड्यांचा गुरू करूनही तू खूप चांगलं तुझ्या मनासारखं आयुष्य जगू शकशील हे मी तुला खात्रीने सांगू शकते. फक्त तुला जरा धीराने घेऊन आधी घरच्यांचं मन वळवायला लागेल. मी तुझ्यासमोर दोन्ही बाजू मांडल्यात आता त्याच्यावर काय अंमलबजावणी करायची हा तुझा निर्णय आहे. तुझी आई तुझी वाट पाहात आहे. तिला एक फोन तरी करू शकशील ना तू.
आठ दिवसांनी स्वानंदच्या आईचा फोन आला. स्वानंद घरी आला आहे. आणि आम्ही दोघं आधी गळ्यात गळा घालून खूप रडलो आणि नंतर अनेक विषयांवर खूप बोललो. आता मला नाही वाटत तो घर सोडून परत जाईल. त्याने गाळ्यावर काम करण्याचा निर्णय घेतला आणि घरी स्वयंपाकही तेवढ्याच हौसेने करतो. त्यामुळे मला त्याची खूपच मदत होते. तुमचे आभार कसे मानू मी.
काऊन्सेलर- आभार मानायची काही गरज नाही. उलट कधी काही वाटलं, काही प्रश्‍न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही दोघंही कधीही माझ्याशी बोलायला येऊ शकता.
----
डॉ. हेमलता पिसाळ
एफ ८/१२, हर्मेस हेरिटेज-२,
शास्त्रीनगर, येरवडा, पुणे - ६
चलभाष - ८६९१९८८८००
source http://www.miloonsaryajani.com/node/1482

आम्हीही माणसं आहोत ...

प्रचंड लोकसंख्येच्या आपल्या देशात लैंगिक विषयांवर उघडपणे चर्चा करणं फारसं चांगलं मानलं जात नाही, हे अर्थातच एक आश्चर्य आहे. चार पुरुषार्थामधला ‘काम’ हा एक पुरुषार्थ मानणाऱ्या ‘कामसूत्र’ ‘अनंगरंग’ यांसारख्या ग्रंथांनी कामशास्त्रात मोलाची भर घालणाऱ्याया देशात आज मात्र कामवासनेकडे एक पापवासना वा लपून-छपून करायची गोष्ट इतक्या संकुचित अर्थाने पाहिलं जात आहे ही खरोखरच खूप खेदाची गोष्ट आहे. लैंगिक विषयांसंबंधी घेतलेल्या या बंदिस्त भूमिकेमुळे, लैंगिकतेविषयीचा एखादा ‘वेगळा’ प्रश्न जेव्हा आपल्या समाजात उपस्थित होतो, तेव्हा आपण काय भूमिका घेणार हे वेगळं सांगायची आवश्यकता राहत नाही. भिन्न लैंगिकता असणाऱ्यांच्या लैंगिक प्रश्नांविषयीच जिथे इतकी बंदिस्तता असेल, तिथे समलैंगिक प्रवृत्ती असणाऱ्यांच्या प्रश्नांविषयी काय परिस्थिती असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी.

आपल्या समाजात L.G.B.T.I.  म्हणजे लेस्बियन, गे, बायसेक्शुअल्स, ट्रान्सजेंडर आणि इण्टरसेक्स या प्रकारच्या ‘सेक्शुअल मायनॉरिटीज्’ आहेत. L.G.B.T.I. मधल्या प्रत्येक सेक्शुअल मायनॉरिटीचे स्वत:चे वेगळे असे प्रश्न आहेत.
L.G.B.T.I. मधील पहिला प्रकार लेस्बियनचा. निर्सगत: एक ते दीड टक्के स्त्रिया लेस्बियन असतात. स्त्री असून स्त्रीविषयीचं लैंगिक आकर्षण असणाऱ्या स्त्रियांना ‘लेस्बियन्स’ म्हणतात. समजा एखाद्या लेस्बियन स्त्रीचं घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. तर, ना तिचा नवरा या विवाहसंबंधातून सुखी होईल ना ती स्वत: उलट समलैंगिक प्रवृत्ती असणाऱ्या लेस्बियन मुलीसाठी नवऱ्याबरोबरचा तिचा संबंध हा ‘बलात्कार’ही ठरू शकतो.
आज समलैंगिकतेला कायदेशीर तसेच सामाजिक मान्यता नसल्यामुळे बरेचसे समलैंगिक त्यांच्या लैंगिक गरजा लपूनछपून पुरवताना दिसतात. या संबंधातल्या चोरटेपणामुळे समलैंगिक पुरेशा सुरक्षित साधनांचा वापर करण्याचे टाळतो.
L.G.B.T.I. मधला दुसरा वर्ग आहे ‘गें’चा. ‘गे’ हा पुरुष असून त्याला पुरुषांविषयी लैंगिक आकर्षण असते. ‘गे’ पुरुषांमध्ये ढोबळमानाने आपण १) थोडेसे स्त्रण अथवा बायकी हावभाव करणारे ‘गे’ (अ‍ॅफिमिनेट ‘गे’) आणि २) स्ट्रेट पुरुषांसारखेच वागणारे (स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे) असा भेद करू शकतो. स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे इतर पुरुषांसारखेच वागत, बोलत असल्यामुळे ते जोपर्यंत स्वत:च्या तोंडाने त्यांच्या समलैंगिकतेविषयी सांगत नाहीत, तोपर्यंत त्यांचं ‘वेगळे’पण लक्षात येत नाही. अगदी लहान वयापासून, ‘गे’ मुलाला त्याच्या लैंगिक आकर्षणातलं त्याचं ‘वेगळेपण’ जाणवत असतं. परंतु बरेचदा लाजेपोटी, घरच्यांच्या धाकापोटी व समाजाच्या दडपणाखाली तो आपलं हे वेगळेपण लपवतो. तो जर ‘स्ट्रेट अ‍ॅक्टींग गे’ असेल तर त्याला त्याची लैंगिकता लपवणं सोपं जातं. याउलट जे ‘अ‍ॅफिमिनेट गे’ असतात, त्यांना लहानपणापासूनच त्यांच्या बायकी हावभावामुळे कुटुंबाच्या आणि समाजाच्या उपहासाला सामोरं जावं लागतं. कमी वयातच त्यामुळे ही मुलं बरेचदा एकलकोंडी, कुढी बनतात. पुढे मोठं झाल्यावरही त्यांच्यातल्या बायकीपणामुळे त्यांना कामाच्या ठिकाणीही उपहासाचीच वागणूक मिळते. त्यामुळे त्यांच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण होण्याची शक्यता वाढते. ‘स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे’चं ‘वेगळे’पण याउलट लक्षात न आल्यामुळे वयात आल्यावर त्यांना इतर स्ट्रेट मुलांसारखंच समजून, त्यांचे आई-वडील त्यांचं ‘स्ट्रेट’ समाजातल्या मुलींशी लग्न लावायला बघतात. एखाद्या ‘गे’ने जर अशावेळी स्वत:च्या वेगळ्या लैंगिकतेविषयी घरच्यांना सांगायचा, त्यांच्यापुढे ‘ओपन’ व्हायचा प्रयत्न केला तर त्याचे कुटुंबियच त्याला तू ‘राक्षसी’ आहेस.. पापी आहेस.. यासारख्या दूषणं त्याला देतात. समलैंगिकतेविषयीच्या अज्ञानामुळे त्याची ‘वेगळी’ लैंगिकता हे काही काळापुरतं असणारं ‘फॅड’ आहे. किंवा वयात येताना वाईट मित्रांच्या संगतीत राहून त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली एक तात्पुरती ‘फेज’ आहे, जी लग्नानंतर जाईल, असं मानतात. ‘सब मर्ज की एक दवा’ या हिशेबाने लग्नानंतर सर्व काही सुरळीत होईल या भाबडय़ा आशेने, समलैंगिकता या विषयाबद्दल काहीच माहिती नसणारे त्याचे पालक त्याच्यावर लग्नासाठी ‘भावनिक दबाव’ आणतात. काही वेळा असे पालक आपल्या ‘गे’ मुलाला ‘बदलण्या’साठी मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जातात. हा मानसोपचारतज्ज्ञ खरोखरच जर सुज्ञ असेल तर तो त्या ‘गे’ मुलाला आणि त्याच्या पालकांना समलैंगिक प्रवृत्ती ही काही व्यक्तींमध्ये नैसर्गिक असते. त्यामुळे ती ‘बदलता’ येत नाही, या वास्तवाची जाणीव करून देतो.
परंतु अजूनही आपल्या भारतात असे काही मानसोपचारतज्ज्ञ आहेत, ज्यांची समलैंगिक प्रवृत्ती बदलायचा प्रयत्न केला पाहिजे’ अशी ठाम भूमिका असते. अशा विचारांच्या मानसोपचारतज्ज्ञांच्या या भूमिकेमागे परंपरेचा संस्कृतीचा जबरदस्त पगडा, जुन्या शिक्षणप्रणालीचा प्रभाव, निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन यासारखी अनेक कारणं असू शकतात. पुण्याच्या ‘समपथिक ट्रस्ट’ या समलैंगिकांच्या मानसिक-शारीरिक आरोग्याच्या विषयावर काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक बिंदुमाधव खिरे आपल्या ‘इंद्रधनुष्य’ या पुस्तकात याविषयी म्हणतात. ‘समलैंगिकांना ‘बदलायचे’ प्रयत्न अनेक प्रकारे केले जातात. यात पुरुषांना पुरुषांची नग्न चित्रं दाखवायची, ते उत्तेजित झाले की त्यांना विद्युत शॉक द्यायचा. यामागे पुरुषांकडून पाहून त्यांना लैंगिक उत्तेजना येणार नाही, हा विचार आहे. त्यानंतर मग स्त्रीची नग्न चित्रं दाखवायची, पण शॉक द्यायचा नाही. अथवा दुसरा प्रकार म्हणजे पुरुषांची लैंगिक चित्रं दाखवायची, बघून तो पुरुष उत्तेजित झाला की, त्याला मग मळमळायला होईल, ओकारी होईल, अशी औषधं, इंजेक्शन्स द्यायची किंवा काऊन्सिलिंगच्या नावाखाली त्यांचं ब्रेन वॉशिंग करायचं यासारखे काही अघोरी उपायही केले जातात.
काही वेळा आपण लग्नानंतर खरंच ‘बदलू’ या भाबडय़ा समजुतीतून तो ‘गे’ मुलगा ‘स्ट्रेट’ मुलीशी लग्नाला तयार होतो. ‘स्ट्रेट अ‍ॅक्टिंग गे’ हा इतर ‘स्ट्रेट’ मुलांसारखाच दिसत-वागत-बोलत असल्यामुळे तसंच आपल्याकडे मुलींचं वा मुलांचं लग्न ठरविताना ‘सेक्शुअ‍ॅलिटी’ विचारण्याची पद्धत नसल्यामुळे अशी लग्नं होतात. काही दिवसांतच पण ‘गे’ मुलाला आपली चूक कळते. मग अखेर त्या लग्नाची परिणती शेवटी घटस्फोटात होते. अशा प्रकारच्या लग्नामुळे केवळ दोन माणसंच नव्हेत, तर दोन कुटुंब उद्ध्वस्त होतात. काही वेळा तर केवळ बघू या आपण ‘बदलू’ शकतो का? या भावनेतून घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाखाली लग्नाला ‘बळी’ पडलेली ही मुलं केवळ बघू या काय होतंय. या भावनेतून लग्न झाल्यानंतर त्या स्ट्रेट मुलीबरोबर ‘संबंध’ ठेवतात, पण थोडय़ाच दिवसांत या संबंधांचा त्यांना उबग येतो. त्यांचा नैसर्गिक लैंगिक कल त्यांना पुन्हा समलिंगी जोडीदार शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. असा ‘पार्टनर’ मिळाल्यावर काही वेळा ही ‘गे’ मुलं मग दुहेरी जीवन जगतात. स्ट्रेट मुलीशी लग्न केल्यानंतर मिळणारी सामाजिक सुरक्षितता- मानसन्मान यावर त्यांना पाणी सोडायचं नसतं. त्यामुळे ‘घरी पत्नी’ व बाहेर पार्टनर’ अशी त्यांची अवस्था असते. अर्थात या सगळ्या गोष्टी अगदी लपूनछपून चाललेल्या असतात. आपला नवरा ‘गे’ आहे याची ना त्या पत्नीला जाणीव असते ना घरच्यांना! आपल्या समाजात समलैंगिकतेबाबत असणारं पराकोटीचं अज्ञान, समलैंगिकता हे काही काळापुरतंच असणारं ‘फॉरेन’चं खूळ आहे यांसारख्या अपसमजुती, तसंच मुलाने लग्न करून वंश वाढवलाच पाहिजे यासारख्या रूढी-परंपरांचं ओझं यामुळे आजही जबरदस्तीने ‘गें’ची मोठय़ा प्रमाणावर लग्न लावून दिली जातात. त्यांच्याबरोबरच त्यांच्याशी लग्न करणाऱ्या अनेक निष्पाप ‘स्ट्रेट’ मुलींच्या आयुष्याशी खेळ केला जातो.
आपल्या समाजात आज लाखोंच्या संख्येने समलैंगिक आहेत. समाजात आज समलैंगिकतेला मान्यता नसल्यामुळे अजूनही बरेचसे समलैंगिक त्यांच्या घरच्यांकडेच ‘ओपन’ नाहीत. त्यामुळे आपल्या मुला-मुलींची लग्न ठरविताना सावधगिरी म्हणून याही बाबींचा गंभीरपणे विचार व्हावा. समलैंगिकता ही नैसर्गिक असल्यामुळे समलैंगिक हा कुठल्याही समाजात, जातीत, तसेच कुठल्याही आर्थिक परिस्थितीत जन्माला येऊ शकतो. समलैंगिकतेचा बुद्धिमत्तेशी काहीच संबंध नसल्यामुळे समलैंगिक हा उच्चशिक्षितही असू शकतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करता, लग्नाच्या वेळी प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याची लैंगिकता विचारात घेऊनच पुढचे पाऊल उचलावे. लग्नसंबंधात होणाऱ्या या प्रकारच्या फसवणुकीला त्यामुळे आळा बसेल.
L.G.B.T.I. मधला तिसरा घटक म्हणजे बायसेक्शुअल्स (उभयरति) बायसेक्शुअल्सना दोन्ही प्रकारचं लैंगिक व भावनिक आकर्षण असतं, पण त्यातही शक्यतो समलैंगिक ‘पार्टनर’ हा त्यांचा ‘चॉइस’ असू शकतो. आपल्या समाजात बायसेक्शुअल्सना ओळखणं खूपच कठीण आहे. कारण बायसेक्शुअल हा भिन्न लिंगीबरोबरही लैंगिक संबंध ठेवून असतो. तरीही त्याचा ‘लैंगिक कल’ समलिंगीकडे अधिक असतो. खूपशा ‘गे’शी स्ट्रेट समाजातले जे पुरुष संबंध ठेवतात. त्यांची ‘स्ट्रेट’ समाजातल्या मुलींशी व्यवस्थित लग्नं झालेली असतात. स्ट्रेट समाजातले असे पुरुष बऱ्याचदा बायसेक्शुअल असण्याची शक्यता असते. अर्थात समलैंगिकांबरोबर संबंध ठेवणारे असे सर्वच्या सर्व पुरुष ‘बायसेक्शुअल’ असतीलच असं म्हणणं जरासं धारिष्टय़ाचं ठरेल. काही वेळा लैंगिक संबंधातल्या वैविध्याच्या आकर्षणातून काही पूर्णत: ‘स्ट्रेट’ मंडळीही समलैंगिकांशी संबंध ठेवताना दिसतात. या स्ट्रेट मंडळींना खऱ्या अर्थाने ‘विकृत’ म्हटलं पाहिजे. कारण समलैंगिकाला समान लिंगाच्या व्यक्तीचं जे आकर्षण असतं त्यात शारीरिकतेच्या जोडीला भावनिकतेचा भागही मोठय़ा प्रमाणावर असतो. म्हणजे एखादा समलैंगिक जेव्हा समलैंगिक संबंध ठेवतो तेव्हा तो त्याच्या ‘पार्टनर’मध्ये शरीराच्या जोडीला बऱ्याचदा मनानेही तितकाच गुंतलेला असतो. या समलैंगिकाचं त्याच्या पार्टनरवर ‘प्रेम’ असतं. परंतु निव्वळ शरीरसुखासाठी ‘गे’शी शरीर संबंध करणाऱ्या स्ट्रेट समाजातल्या पुरुषांमध्ये मात्र ‘गें’च्या ‘समलैंगिक कला’चा गैरफायदा उठवत केवळ त्याच्याबरोबर ‘मजा’ मारण्याची वृत्ती दिसून येते. ‘स्ट्रेट’ समाजातल्या या ‘विकृत’ माणसांचा शोध घेणे शक्य नाही, कारण यासाठी आवश्यक असणारा ‘ओपननेस’ सध्या तरी आपल्याकडे नाही.
L.G.B.T.I. मधला चौथा प्रकार आहे ‘ट्रान्सजेंडर्स’. आपल्या समाजात आपण त्यांना ‘तृतीयपंथी’ म्हणून ओळखतो. तृतीयपंथींतले जे तृतीयपंथी ‘गुरूं’कडे जाऊन दीक्षा घेतात. अशा तृतीयपंथींना ‘हिजडा’ असं म्हटलं जातं. समलैंगिकता व ट्रान्सजेंडर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. समलैंगिकता हा लैंगिक कलाचा एक प्रकार आहे तर ‘ट्रान्सजेंडर’ हा लिंगभावाचा एक प्रकार आहे. हिजडे स्वत:ला ‘स्त्री’ समजतात व पुरुषांकडे आकर्षित होतात. हिजडय़ांच्या समाजात आजच्या घडीला तरी ‘बस्ती’, ‘बधाई’, ‘पण’ ही तीनच उपजीविकेची साधनं उपलब्ध आहेत. ‘बस्ती’ म्हणजे भीक मागणे, ‘बधाई’ म्हणजे समारंभाच्या ठिकाणी नाचगाणी करून पैसा मिळविणे आणि ‘पण’ म्हणजे शरीरविक्रय करणे.
आपल्या ‘स्ट्रेट’ समाजाला समांतर असा हिजडय़ांचा एक स्वतंत्र समाज आहे. हिजडय़ांची दिल्लीवाला, पूनावालासारखी आठ घराणी आहेत. हिजडय़ांच्या समाजात त्यांचे ‘गुरू’ आहेत. या गुरूंवर हिजडय़ांच्या आठ घराण्यांचे ‘नायक’ आहेत. आज तरी हिजडय़ांना त्यांचे स्वत:चेच कुटुंबीय आणि समाज स्वीकारीत नसल्यामुळे, हिजडय़ांना त्यांच्या अस्तित्वासाठी ‘गुरू’ आणि ‘नायकांवर’ अवलंबून राहणं भाग आहे. पोलीस हिजडय़ांना भीक मागू देत नाहीत. सध्याच्या काळात समारंभातून केल्या जाणाऱ्या नाचगाण्यांवर पोट भरणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे सध्या तरी हिजडय़ांकडे ‘पण’ म्हणजे शरीरविक्रयाशिवाय चरितार्थासाठी चौथा पर्याय उपलब्ध नाही. बरेचसे हिजडे त्यामुळे साहजिकच शरीरविक्रय करून आपलं पोट भरताना दिसतात. हिजडय़ांना त्यांच्या कमाईतला बराचसा भाग त्यांच्या ‘गुरूं’ना आणि ‘नायकां’ना द्यावा लागतो. खूपदा हिजडय़ांचं त्यांच्या ‘गुरू’ आणि ‘नायकां’कडूनच आर्थिक शोषण केलं जातं. हिजडय़ांना ‘सेक्स वर्कर’ बनविण्यातही अनेकदा त्यांच्या ‘गुरूं’चाच हात असतो. परंतु आपल्या समाजात त्यांना काहीच स्थान नसल्यामुळे हिजडय़ांना नाइलाजाने का होईना ‘गुरू’ आणि ‘नायकां’ना शरण जाण्याशिवाय पर्याय नसतो. कारण ‘स्ट्रेट’ समाजात त्यांचा कुणीच वाली नसतो. हिजडय़ांकडे जाणारी ‘गिऱ्हाईकं’ ही आपल्या ‘स्ट्रेट’ समाजातली असतात. त्यांनी हिजडय़ांशी केलेल्या असुरक्षित शरीरसंबंधातून एडस्चा मोठय़ा प्रमाणावर प्रसार होतो. काही वेळा पोटासाठी दिवसाला १०-१० पुरुष ‘घेणाऱ्या’ हिजडय़ांचे गुद्द्वार या शरीरसंबंधांमुळे मोठे झालेले असते. बरेचदा शरीरसंबंधाच्या वेळी कुठल्याही प्रकारची ‘सुरक्षित साधनं’ न वापरल्यामुळे बऱ्याचशा हिजडय़ांना गुद्द्वाराच्या जागी विविध प्रकारचे भयानक लैंगिक रोग होतात. आपल्या समाजातले डॉक्टर अशा रोग्याला तपासायलाही फारसे उत्सुक दिसत नाहीत. बऱ्याचदा हिजडय़ांना त्यांच्या विशिष्ट जीवनशैलीमुळे होणाऱ्या रोगांची माहिती डॉक्टरांनादेखील नसते. याचं कारण आपल्या चालू वैद्यकीय अभ्यासक्रमात समलैंगिकांच्या शारीरिक विकारांचा व त्यांच्यावरील उपचारांचा विशेष समावेश नसल्यामुळे आपल्याकडच्या डॉक्टरांना या विषयाची फारशी माहिती नसते. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेले हिजडेही त्यांना कितीही शारीरिक त्रास झाला तरी त्यांच्या विशिष्ट ‘आयडेंटिटी’मुळे आपल्या समाजातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतात. त्यामुळे डॉक्टरांनाही त्यांच्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात ‘असे’ पेशंट तपासायलाच मिळत नाहीत. सध्या तरी पुरेशा योग्य वैद्यकीय मदतीअभावी एड्ससारख्या रोगाने अथवा एखाद्या भयानक लैंगिक रोगाचं शिकार होऊन तडफडून सडून मरणं हेच दुर्दैवानं त्यांचं भागधेय आहे. हिजडय़ांची आपल्या समाजातली लोकसंख्या लक्षात घेता, हिजडय़ांसाठी काम करणाऱ्या एनजीओज्चे हिजडय़ांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न फारच तोकडे आहेत, असं म्हणावं लागेल.
L.G.B.T.I. मधल्या पाचव्या प्रकाराला इण्टरसेक्स अर्थात उभयलिंगी म्हटलं जातं. या प्रकारच्या व्यक्तींना स्त्री आणि पुरुषाचे असे दोन्ही लैंगिक अवयव असतात. हा नैसर्गिक अपघातच असतो. मात्र या व्यक्तींची संख्या समाजात एक टक्क्य़ांहूनही कमी असते. त्यामुळे त्यांच्यावर योग्य संशोधन उपलब्ध नाही. मात्र इण्टरसेक्स व्यक्ती या खूपच गुंतागुंतीच्या भावनांची शिकार असतात. बऱ्याचदा श्रीमंत कुटुंबातल्या इण्टरसेक्स व्यक्तींचे आधुनिक शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशय आणि स्त्री लैंगिक अवयव काढून टाकले जातात व त्यांना पुरुष म्हणूनच समाजात पुढे उभं केलं जातं.
L.G.B.T.I. च्या विविध प्रश्नांचा आताच आपण थोडक्यात आढावा घेतला. हे सगळेच प्रश्न लैंगिकतेशी निगडित असल्याने अतिशय गुंतागुंतीचे आहेत. डॉ. भूषण शुक्ल म्हणतात त्याप्रमाणे, समलैंगिकता हा मानवी लैंगिकतेचाच एक वेगळा ‘आयाम’ आहे. आपल्या ८५ टक्के ‘स्ट्रेट’ समाजाच्या भिन्न लैंगिकतेपेक्षा १५ टक्के समलिंगीयांची समलैंगितता ही ‘वेगळी’ आहे. याचा अर्थ एवढाच आहे की, समलैंगिक हे ‘मनोविकृत’ नसून आपल्यापेक्षा लैंगिकतेबाबत फक्त ‘वेगळे’ आहेत. समलैंगिकांच्या या ‘वेगळ्या’ लैंगिकतेला सध्या तरी कायदेशीर व सामाजिक पाठिंबा नसल्यामुळे त्यांच्या ‘वेगळ्या’ लैंगिकतेमुळे त्यांचे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत.
समलैंगिक संबंध हे गुन्हेगारी कृत्य समजण्यात येऊ नये म्हणून सध्या सुप्रीम कोर्टात समलैंगिकांचा लढा सुरू आहे. या संदर्भात ‘हमसफर’ या समलैंगिकांसाठी काम करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अशोक रावकवी यांना या संदर्भात विचारलं असता, काहीसे चिडून ते म्हणाले. आमचा मूळ मुद्दा असाय की, ‘सेक्शुअल’ राइट हा ‘ह्य़ुमन’ राइट आहे. आम्ही काय कुणावर ‘जबरदस्ती’ करीत नाही. निसर्गत:च जशी डावरी माणसं असतात तशीच काही माणसं निसर्गत:च समलैंगिक असतात. असं असूनही इराणमध्ये गेल्या वर्षी ३० ते ४० समलैंगिकांना मारून टाकण्यात आलं. हे चाललंय तरी काय? समलैंगिक असलो म्हणून काय झालं? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत.. तेव्हा आम्हालाही जगण्याचा अधिकार आहेच. आमची लढाई कुठल्या धर्माविरुद्ध नाही.. तर आमच्या मूलभूत मानवी अधिकारांच्या संरक्षणासाठी आहे!
अशोक रावकवी म्हणतात ते अगदी खरंय. समलैंगिक हाही तुमच्या-आमच्यासारखाच एक माणूस आहे. तेव्हा माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं.. एवढी साधी अपेक्षा त्याने समाजाकडून का करू नये?

source:- लोकप्रभा 

'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर


भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.
काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.
उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.
२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.
CP and Shal.jpg
`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'
एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.
त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.
''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''
''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''
वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.
''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.
काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''
उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!
समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.
***
माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.
समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!
समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.
इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!
आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?
लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.
२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.
आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.
आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.
आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.
याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.
***
समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.
source : मायबोली